IND vs NZ 1st Test :- बुधवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून भारताचे पुढच्या पिढीतील दमदार फलंदाज यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल, आपला उत्कृष्ट असलेल्या फॉर्म पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील. सध्याच्या घडीला कर्णधार रोहित शर्मा व रनमशीन विराट कोहली हे यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असून त्यांनी घालून दिलेला आदर्श पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी गिल व जैस्वाल यांच्या खांद्यावर असणार आहे.
सामन्याची वेळ : सकाळी ९. ३० पासून.
स्थळ : चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
शुभमन गिलने गेल्या दहा डावांमध्ये तीन शतके तर दोन अर्धशतके झळकावली आहे. त्याबरोबरीने यशस्वी जैसवालने देखील आठ डावांमध्ये १ द्विशतक तर पाच अर्धशतकी खेळी केल्या आहेत. दोन्ही फलंदाजानी बांगलादेश विरुद्ध खेळताना शानदार खेळी केल्या होत्या. हाच सूर कायम ठेवून न्यूझीलंड संघाचा सामना या दोघांना करावा लागणार आहे. बांगलादेशच्या तुलनेत न्यूझीलंड हा दमदार संघ असून, त्यांचे गोलंदाज या दोन्ही फलंदाजासमोर आव्हान उभे करण्यासाठी सक्षम आहेत.
दोन्ही फलंदाजानी गेल्या मालिकेत चांगली कामगिरी केली असली तरी तरी दोघांनी देखील अनेकदा आपली विकेट गमावली आहे. शुभमन गिलने वेगवान गोलंदाजांकडून येणाऱ्या चेंडूचा सामना करण्याच्या समस्येवर मात केली असली तरी अशे चेंडूवर विकेट गमावणे टाळावे लागेल. चेन्नई येथील लढतीमध्ये बांगलादेशच्य हसन महमूदविरुद्ध खेळताना अनेकदा शुभमन अडखळता होता. त्याला एकदा तंबूत देखील जावे लागले होते. जैस्वाल देखील आक्रमक फटके मारण्याच्या नादात तीन वेळा तंबूत परतला आहे. गेल्या २० डावांपैकी १२ डावांमध्ये वेगवान गोलंदाजांनी त्याला बाद करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या या मालिकेतया दोन्ही फलंदाजांना आपल्या चुका सुधारून आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयारी करावी लागणार आहे.
कर्णधार रोहित…. रनमशीन विराट
न्यूझीलंडकडे मॅट हेन्री, विल्यम ओ’रुर्के आणि अनुभवी टीम साऊदी असा तिखट मारा करणारे वेगवान गोलंदाज आहेत. सध्याच्या घडीला कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली हे आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाहीत. यावर्षात रोहित शर्माने १५ कसोटी डावांमध्ये २ शतके व १ अर्धशतक झळकावले असले तरी तो १३ डावांमध्ये केवळ ४९७ धावाच करू शकला आहे. विराट कोहली ९००० धावांच्या टप्प्यापासून केवळ ५३ धावा दूर आहे. या वर्षात कोहलीने सहा डावात एकही अर्धशतक झळकावले नाही. त्याने दक्षिण आफ्रिका संघासमोर ४६ तर बांगलादेशसमोर ४७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
अश्विन, जडेजाचे आव्हान
न्यूझीलंडकडे एजाज पटेल व रचिन रवींद्र हे दोन फिरकीपटू असून भारतीय फलंदाजांना त्यांचा सामना करावा लागणार आहे. या दोन्ही फिरकीपटूंनी यापूर्वी देखील भारताच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. मात्र, भारताच्या फलंदाजांचा फॉर्म पाहता यावेळी भारतासमोर मोठ्या समस्याच नसतील . मात्र, न्यूझीलंडला गोलंदाजी व फलंदाजी अशा दोन्ही समस्या आहेत. फिरकीपटू निष्प्रभ ठरल्याने श्रीलंकेविरुद्ध त्यांना २-० असे पराभूत व्हावे लागले होते. आता यावेळी रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा या धोकादायक फिरकीपटूंचा सामना करावा लागणार आहे.
IND vs NZ : कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, सर्वात घातक गोलंदाज झाला बाहेर…
पाचवा गोलंदाज : सिराज, कुलदीप कि अक्षर ?
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजासाठी अनुकूल आहे. त्यामुळे यावर अश्विन आणि जडेजा ही जोडी धमाल करू शकते. याशिवाय जसप्रीत बुमराह देखील धडाकेबाज फॉर्ममध्ये आहे. त्याने बांगलादेशचे ११ फलंदाज टिपले होते. आकाशदीपने देखील बांगलादेश विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. मात्र पाचवा गोलंदाज कोण असणार, यावर संघ व्यवस्थापना विचार करावा लागणार आहे. मागील मालिकेप्रमाणे मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव व अक्षर पटेल हे देखील अंतिम ११ मध्ये दिसू शकतात. अक्षर पटेलकडे फलंदाजी करण्याची देखील क्षमता आहे.
विल्यमसननंतर सियर्स…
येथील हवामानही स्वच्छ नसल्यामुळे खेळ सुरू होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाजाज व माजी कर्णधार फलंदाज केन विल्यमसन दुखापतीमुळे आधीच संघाच्या बाहेर आहे. आता वेगवान गोलंदाज बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याने किवी संघाला आणखी एक धक्का बसला आहे. त्याच्या जागी जेकब डफीचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो पहिल्या कसोटीतून पदार्पण करण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत व ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, मार्क चॅपमन, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, टॉम ब्लंडेल, एजाज पटेल, जेकब डफी, मॅट हेन्री, टिम साउदी , विल्यम ओ’रुर्के.
IND vs NZ 1st Test : बेंगळुरू कसोटीत यशस्वी जैस्वालला इतिहास रचण्याची संधी, फक्त ’71’ धावांची गरज….
लाइव्ह ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंग कुठे बघायचे…
भारतीय चाहत्यांना Sports18 नेटवर्क चॅनेलवर भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. स्पोर्ट्स 18 नेटवर्ककडे या मालिकेचे प्रसारण अधिकार आहेत. याशिवाय, जिओ सिनेमा ॲप आणि साइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. तर न्यूझीलंडमध्ये स्काय स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण केले जाईल.