IND vs NZ 1st Test (Rishabh Pant Records) :- एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला 8 विकेट्सने लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. पहिल्या डावात माती खाल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी 462 धावा करताना दमदार पुनरागमन केले. मात्र, पहिल्या डावातील फरकामुळे किवीसंघासमोर अखेरच्या दिवशी अवघे 110 धावांचे आव्हान उभे राहू शकले आणि ज्यामुळे त्यांनी अगदी सहज विजय मिळवला.
भारताच्या दुसऱ्या डावत यष्टीरक्षक ऋषभ पंतचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. पंत 99 धावा करून बाद झाला.यासह, कसोटीत 99 धावांवर बाद होणारा तो जगातील चौथा आणि दुसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला. भारताच्या दुसऱ्या डावात पंतची 99 धावांवर विल्यम ओ’रुर्केच्या चेंडूने बॅटची कड घेतली आणि चेंडू स्टंपवर आदळला. यापूर्वी, कसोटीत 99 धावांवर बाद होणारा न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम हा जगातील पहिला यष्टिरक्षक आहे. भारताने सामना गमविला असला तरी, पंतने या सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यातील अनेक हवेसे आणि काही नकोसे देखील आहेत.
कसोटीमध्ये 2500 धावा पूर्ण
ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये 2500 धावा करणारा भारताचा चौथा यष्टिरक्षक ठरला आहे. पंतच्या आधी हा पराक्रम धोनी, सय्यद किरमाणी आणि फारुख इंजिनिअरने केला होता. यष्टिरक्षक म्हणून, भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा धोनी आहे ज्याने 4874 धावा केल्या आहेत.
Another one into Rishabh Pant’s 90s collection 😯#WTC25 | #INDvNZ: https://t.co/aDyzitCVDn pic.twitter.com/xixGv9F8JG
— ICC (@ICC) October 19, 2024
सातव्यांदा ‘नर्व्हस 90’चा बळी
पंत कसोटीत सातव्यांदा नर्व्हस 90चा बळी ठरला आहे. सर्वाधिक वेळा अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर भारताने सर्वाधिक वेळा 90 ते 99 च्या स्कोअरवर कसोटीत बाद होण्याचा विक्रम केला आहे. सचिन 10 वेळा नर्व्हस 90चा बळी ठरला आहे.
फारुख इंजिनिअरशी बरोबरी
ऋषभ पंत दुसऱ्या डावात 99 धावा करून बाद झाला. हा त्याचा कसोटी क्रिकेटमधील 18वा 50+ धावा आहे. यासह, त्याने भारतासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या बाबतीत फारुख इंजिनियरची बरोबरी केली आहे. फारुख इंजिनिअरनेही आपल्या कसोटी कारकिर्दीत 18 वेळा 50+ स्कोअर केले.
कसोटीत 99 वर बाद होणारे यष्टीरक्षक
बँडम मॅक्युलम वि. श्रीलंका, नेपिअर, 2005
एम.एस.धोनी वि. इंग्लंड, नागपूर, 2012
जॉनी बेअरस्टॉ वि. द.आफ्रिका, ऑल्ड ट्रॅफल्ड, 2017
ऋषभ पंत : वि. न्युझीलंड, बंगळुरू, 2024
सर्वाधिक वेळा ‘नर्व्हस 90’चे बळी
सचिन तेंडुलकर : 10
राहुल द्रविड : 09
ऋषभ पंत : 07
सुनील गावसकर : 05
एम.एस.धोनी : 05