भारत आणि इंग्लंड यांच्यातील 22 जानेवारीपासून खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाची बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी मोहम्मद शमीचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. मोहम्मद शमी गेल्या 15 महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर होता. त्याने शेवटचा सामना वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये खेळला होता. त्याचे पुनरागमनाने टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अक्षर पटेलवर सोपवली मोठी जबाबदारी
या संघाचे नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तर अक्षर पटेल याच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली. अक्षर पटेल टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन असणार आहे. हार्दिक पांड्याला व्हाईस कॅप्टन्सीपदावरून नारळ देण्यात आला आहे. विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्या ऐवजी ध्रुव जुरेल आणि संजू सॅमसन याला संधी देण्यात आलेली आहे. तर मोहम्मद सिराज याला देखील डच्चू देण्यात आला आहे.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
Mohammad Shami returns as India’s squad for T20I series against England announced.
All The Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/jwI8mMBTqY
— BCCI (@BCCI) January 11, 2025
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक
22 जानेवारी – पहिला T20 सामना, कोलकाता
25 जानेवारी – दुसरा T20 सामना, चेन्नई
28 जानेवारी – तिसरा T20 सामना, राजकोट
31 जानेवारी – चौथा T20 सामना, पुणे
2 फेब्रुवारी – पाचवा T20 सामना, मुंबई
टी-ट्वेंटी मालिकेसाठी इंग्लंडची टीम
जॉस बटलर (कॅप्टन), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड