नागपूर : इंग्लंडविरूद्धची टी20 मालिका भारताने 4-1 ने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. उद्यापासून म्हणजेच 6 फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करताना दिसणार आहेत. मात्र त्याअगोदर आपण या सामन्यासाठी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असणार आहे? आणि सामन्याचा पिच रिपोर्ट कसा असणार आहे? याबाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
इंग्लड संघ भारताला मोठे आव्हान देऊ शकतो. अनेकदा या संघाने भारतावर मात केली आहे. पण ही मालिका भारतात होणार असल्याने भारताला भारतात हरवणे हे इंग्लडला थोडे जड जाणार आहे. मात्र दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचा गेलेला फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. परंतु आता फॉर्मेट आणि परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे हे खेळाडू नक्कीच आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतू शकतात.
नागपूरच्या स्टेडिअमचा पिच रिपोर्ट काय?
नागपूरची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी योग्य आहे, पण येथे मोठे स्कोअर देखील बनवले जातात. पिच क्युरेटरच्या मते, हे पिच 300 पेक्षा जास्त धावा करण्यास सक्षम आहे.त्यामुळे या सामन्यात भारत तीन फिरकीपटूना घेऊन उतरू शकतो. त्यामुळे भारताच्या फिरकीपटूंचा सामना करणे इंलंडसाठी नक्कीच सोप्पे नसणार आहे.
मॅच प्रेडिक्शन
या सामन्याचे मॅच प्रेडिक्शन पाहायला गेलं तर सामना अटीतटीचा पाहायला मिळू शकतो. मात्र तरीदेखील भारताचे पारडे जड आहे. कारण हा सामना भारतात होत असल्याने भारतीय खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे. मात्रदेखील इंग्लडच्या संघाला कमी लेखून चालणार नाही कधीही बाजी पलटण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेईंग 11?
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.
इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
फिल साल्ट, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकिपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ब्रायडेन कार्स, आदिल रशीद, गस अॅटकिन्सन / साकिब महमूद आणि मार्क वूड.