IND vs BAN Test Series : – भारतीय संघ निश्चित चांगला आहे. मात्र जो संघ सामन्यात चांगली कामगिरी करेल, त्या संघाला विजय मिळणार आहे. आम्ही भारतीय संघाच्या विरद्ध खेळण्यासाठी उत्सूक आहोत, भारताला आव्हान देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, यासाठी आम्ही सरावाला सुरुवात केली असल्याचे, बांगलादेश संघाचा युवा वेगवान गोलंदाज नाहिद राणाने सांगितले.
भारत आणि बांगलादेश संघाच्या दरम्यान 2 कसोटी लढतींच्या मालिकेला 19 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारताने संघाची घोषणा केली असून कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा कडे सोपविण्यात आली आहे. बांगलादेश संघाने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये पाकिस्तानला मायदेशात पराभूत करण्याचा विक्रम केला होता.
ही मालिका बांगलादेश संघाने 2-0 अशी जिंकली होती. बांगलादेशच्या या विजयात २१ वर्षांचा युवा वेगवान गोलंदाज असलेल्या नाविद राणाने तशी दीडशेच्या वेगाने निरंतर गोलंदाजी केली होती. रावळपिंडी येथे झालेल्या कसोटी सामन्यात राणाने 44 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद करताना संघाच्या विजयात मोठा हातभार लावला होता.
पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी मी देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्देश्याने गेलो होतो, पाकिस्तानमध्ये आमची चांगली कामगिरी झाली. माझ्याकडून असलेल्या अपेक्षेनुसार माझा खेळ झाल्याने मी आनंदी असल्याचे नाविद राणाने बोलताना सांगितले.
19 सप्टेंबर पासून चेन्नई येथे मालिकेला सुरुवात होणार आहे. चेन्नई येथील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना साहाय्य करणारी असण्याची शक्यता आहे. या संदर्भात बोलताना तो म्हणाला, मी या मालिकेत माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे, मात्र वेगाच्या बाबतीत मी कोणतीच भविष्यवाणी करून शकत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. रावळपिंडीमध्ये राणाने 152 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी केली होती. मी वेगाने गोलंदाजी करायची असे कधीच ठरवत नाही, मात्र संघाने आखलेल्या रणनीतीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो.
मी प्रत्येकाकडून शिकतो…
प्रत्येक खेळाडूमध्ये काही विशेष गुण असतात. हे गुण हेरून मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जगातील प्रत्येक गोलंदाजाकडून मी काही ना काही तरी शिकतो. भारताचा बुमराह, ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली, न्यूझीलंडचा जेम्स बॉण्ड असे मला बांगलादेशचा नाहिद राणा अशी मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.