भारताचा पहिला डाव ६ बाद ४९३ वर घोषित, बांगलादेशला दुसरा झटका

इंदूर : भारत विरूध्द बांगलादेशदरम्यान इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिला कसोटीच्या तिस-या दिवशीच्या खेळास सुरूवात झाली आहे. बांगलादेशने दुस-या डावात फलंदाजीस सुरूवात केली असून बांगलादेशचे दोन्ही फलंदाज तबूंत परतले आहे.

सलामीवीर शदमन इस्लामला ६ धावांवर इशांत शर्माने तर इमरूल केसला ६ धावांर उमेश यादवने त्रिफळाचित केलं आहे. सध्या बांगलादेशची धावसंख्या १०.० षटकांत २ बाद २० अशी आहे. बांगलादेश अजूनही ३२३ धावांने पिछाडीवर आहे.

दरम्यान, आज सकाळी (शनिवारी)भारतीय कर्णधार विराट कोहलीने कालच्या धावसंख्येवर म्हणजेच ६ बाद ४९३ वर पहिला डाव घोषित केला आहे. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावानंतर ३४३ धावांची मजबूत आघाडी मिळाली असून एक डाव राखून विजयाची संधी भारताकडे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.