IND vs BAN : ऐतिहासिक कसोटीत विराटचे ऐतिहासिक शतक..!

कोलकाता – भारत-बांग्लादेशमध्ये आज पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतक ठोकल आहे. बांग्लादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपल्यानंतर भारताने पहिल्या डावात पुजारा-रहाणेच अर्धशतक आणि विराटच्या शतकाच्या जोरावर कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

दरम्यान, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावल्यानंतर ते माघारी परतले, मात्र विराटने खेळपट्टीवर स्थिर राहत आपल शतक झळकावल. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीच हे ४१ वे शतक ठरले आहे. या कामगिरीसह विराट कोहलीने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगशी बरोबरी केली आहे.

दरम्यान पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावल्यानंतर, उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनेही अर्धशतकी खेळी करत विराटला साथ दिली. अजिंक्यने ६९ चेंडूत अजिंक्यची ७ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.