IND vs BAN 2nd T20 (TOSS UPDATE) : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने ग्वाल्हेर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्ये 7 विकेट्सने विजय मिळवला. अशा स्थितीत आता सूर्यकुमार यादव दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.
दुसरीकडे, बांगलादेशी कर्णधार हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा बांगलादेश संघाच्या बाजूनं लागला आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजासाठी मैदानात उतरावं लागेल.
🚨 Toss Update 🚨
Bangladesh win the toss in the 2nd T20I and elect to bowl in Delhi.
Live – https://t.co/Otw9CpO67y#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/3OMaARLaQ0
— BCCI (@BCCI) October 9, 2024
दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारतीय संघाने 14 सामने जिंकले आहेत. तसेच बांगलादेशने केवळ 1 सामना जिंकला आहे.
दरम्यान, आज बांगलादेश संघ मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र, भारतीय संघाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे पहिला सामना जिंकला, त्यावरून बांगलादेश संघासाठी विजय मिळविणे मोठे आव्हान असणार आहे. वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेत असून देखील पहिल्या लढतीत गाजविलेले वर्चस्व हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये असलेली भारताची बेंच स्ट्रेंथ मजबूत असल्याचाही दिसून आले आहे.