IND vs BAN 1st Test (Rishabh Pant) :- भारताचा डावखुरा फलंदाज ऋषभ पंत प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला असून तब्बल 2 वर्षांनंतर तो कसोटी सामना खेळणार आहे. 25 डिसेंबर 2022 रोजी तो शेवटचा कसोटी सामना बांगलादेश विरुद्धच खेळाला होता. अपघातानंतर पुनरागमन देखील बांगलादेश संघाविरुद्धच करणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्या गुरुवार, 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
25 डिसेंबर 2022 चा कसोटी सामना संपल्यानंतर चार दिवासांनी ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर तब्बल 633 दिवसांनी पुन्हा तो कसोटी लढतीसाठी मैदानात उतरणार आहे. बांगलादेश विरुद्ध त्याने मीरपूर येथे झालेल्या कसोटीमध्ये 93 धावांची महत्वाची खेळी केली होती. त्या खेळीनेच भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
मीरपूर कसोटीनंतर ऋषभ पंत चेन्नई येथील चिदंबरम मैदानावर होणाऱ्या बांगलादेश कसोटीतून पुनगरागमन करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान कसोटीमध्ये स्थान मिळविण्यासाठी अनेक खेळाडूंनी प्रयत्न केले होते. मात्र, संघातील स्थान ते पक्के करू शकले नाहीत. ध्रुव जुरेलने इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये यष्टीरक्षण व फलंदाजीने प्रभावित केले होते. मात्र, तो संघामध्ये स्थान निश्चित करू शकला नाही. आता ऋषभ पंत तंदुरुस्त झाल्याने जुरेलचा दावा कमकुवत झाला आहे.
या संदर्भात बोलताना भाराताचे प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले की, ऋषभ पंत आक्रमक फलंदाज असल्याने तो कसोटीमध्ये काय करू शकतो, याची सर्वाना कल्पना आहे. त्याने देशात आणि परदेशात देखील भरपूर धावा केल्या आहेत. एखाद्या संघात पंत सारखा विस्फोटक खेळाडू असणे, समोरच्या संघाच्या मानसिकतेवर परिणाम करणारे ठरू शकते. पंत कोणत्याही क्षणी मोठा प्रभाव टाकू शकतो.