India vs Bangladesh 1st Test (Day 3) : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. आज कसोटीचा तिसरा दिवस आहे. या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. यानंतर बांगलादेशचे फलंदाज पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत आणि त्याचा डाव अवघ्या 149 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाला 227 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर टीम इंडियाने दुसरा डाव 4 बाद 287 वर घोषित करत बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
And, that’s the declaration from the Indian Captain.
Shubman Gill and Rishabh Pant bring up their Test centuries as #TeamIndia gets to a total of 287/4 in the second innings.
Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/Q7IBT1zlFm
— BCCI (@BCCI) September 21, 2024
भारतासाठी दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी दमदार कामगिरी केली. यशस्वी आणि रोहित दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले, पण ते झटपट बाद झाले. यादरम्यान रोहित 5 धावा करून तर यशस्वी 10 धावा करून बाद झाला. विराट कोहली 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर गिल आणि पंत यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 167 धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली.
यादरम्यान गिलने 176 चेंडूंचा सामना करत नाबाद 119 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. तर यष्टिरक्षक फलंदाज पंतने अप्रतिम कामगिरी केली. त्याने 128 चेंडूंचा सामना करत 109 धावा केल्या. पंतच्या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. पंत बाद झाल्यानंतर के. एल राहुल मैदानात आला. केएल राहुलने 19 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारासह नाबाद 22 धावा केल्या. त्यानंतर 287 वर डाव घोषित करण्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मानं निर्णय घेतला.
बांगलादेशच्या गोलंदाजांना दुसऱ्या डावात विशेष काही करता आले नाही. मात्र, मेहदी हसन मिराजने संघाकडून 2 बळी घेतले. त्याने 25 षटकात 103 धावा दिल्या. तस्किन अहमद आणि नाहिद राणा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आता बांगलादेशसमोर डोंगरासारखे विशाल लक्ष्य आहे. पहिल्या डावात 149 धावांवर संघ सर्वबाद झाला होता.