India vs Bangladesh 1st Test (Day 2) : भारत विरुद्ध चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेशची कामगिरी अत्यंत खराब झाली. नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेशी संघ पहिल्या डावात 149 धावांवर आटोपला. यादरम्यान टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी कहर केला. भारताकडून जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. बांगलादेशचे फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. विशेषत: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बांगलादेशचे सर्वाधिक नुकसान केले. जसप्रीत बुमराहच्या उसळत्या आणि स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर बांगलादेशचे फलंदाजही टिकू शकले नाहीत.
तत्पूर्वी, टीम इंडियाने पहिल्या डावात 91.2 षटकात सर्वबाद 376 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. बांगलादेशच्या पहिल्या डावानंतर आता टीम इंडियाकडे 227 धावांची आघाडी झाली आहे.
Innings Break!
Four wickets for Bumrah and two apiece for Siraj, Akash Deep and Jadeja as Bangladesh are all out for 149 runs.
Trail by 227 runs.
Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/hT7IKyTlqW
— BCCI (@BCCI) September 20, 2024
बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 32 धावा केल्या. त्याने 64 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारले याशिवाय लिटन दासने 42 चेंडूत 22 धावा तर मेहदी हसन मिराजने नाबाद 27 धावा केल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतो 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. खराब सुरुवातीनंतर संघाला सावरता आले नाही आणि भारतीय गोलंदाजांनी दबावही कमी होऊ दिला नाही. अशा प्रकारे संपूर्ण संघ 149 धावांवर गडगडला.
बुमराह-आकाश दीपने केला कहर…
बुमराहने घातक गोलंदाजी करत 4 बळी घेतले. त्याने 11 षटकात 50 धावा दिल्या. या काळात 1 मेडन ओव्हरही टाकली. तर आकाश दीपने 5 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले. या दोघांनी बांगलादेशचे कंबरडे मोडले. यानंतर सिराज आणि जडेजाने उर्वरित काम पूर्ण केले. सिराजने 10.1 षटकात 30 धावा एका मेडन ओव्हरसह 2 बळी घेतले.तर फिरकीपटू रवींद्र जडेजाने 8 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले.
भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला….
चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताने 6 गडी गमावून 339 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बांगलादेशी गोलंदाजांनी पुढील 37 धावांत उर्वरित चार विकेट घेत भारताला 400 धावांचा टप्पा ओलांडण्यापासून रोखले. रवींद्र जडेजाचे शतक हुकले असले तरी रविचंद्रन अश्विनने शतक पूर्ण केले आणि तो 113 धावांवर बाद झाला. यावेळी अश्विन मैदानातून पॅव्हेलियनमध्ये परतत असताना संपूर्ण स्टेडियमने त्याच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या.
Team India : गंभीरच्या मार्गदर्शानाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करेल – राहुल द्रविड
एकवेळ 144 धावांत 6 विकेट गमावणाऱ्या टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा गाठणेही कठीण वाटत होते. पण रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील 199 धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियानं पहिल्या डावात 376 धावा करताना सामन्यात पुनरागमन केलं.