Ashwin broke Sachin Tendulkar’s Biggest Test Record : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनने चेन्नई कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बॅट आणि बॉलने धुमाकूळ घालणाऱ्या अश्विनला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अश्विनने पहिल्या कसोटीत एकूण फलंदाजीत 113 धावा काढत आणि गोलंदाजीत 6 फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. यासह त्याने या सामन्यात अनेक मोठे विक्रम केलेच पण त्याबरोबर अश्विनने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडित काढला आहे.
बांगलादेशविरूध्द खेळलेल्या चेन्नई कसोटी सामन्यातील सामनाविजयी कामगिरीसाठी रविचंद्रन अश्विनला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार जिंकल्याने अश्विन ‘मॅन ऑफ द मॅच’ (सामनावीर) आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज'(मालिकावीर) असे मिळून सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.
अश्विनने आतापर्यंत 20 पुरस्कार जिंकले आहेत. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे, ज्याने कसोटीतील ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ असे एकूण 19 पुरस्कार जिंकले आहेत.
A game-changing TON 💯 & 6⃣ Wickets! 👌 👌
For his brilliant all-round show on his home ground, R Ashwin bags the Player of the Match award 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/jV4wK7BOKA #TeamIndia | #INDvBAN | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Nj2yeCzkm8
— BCCI (@BCCI) September 22, 2024
कसोटीत सर्वाधिक (सामनावीर+मालिकावीर) पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू…
1.रविचंद्रन अश्विन (10 सामनावीर + 10 मालिकावीर) = 20 पुरस्कार
2. सचिन तेंडुलकर (14 सामनावीर + 5 मालिकावीर)=19 पुरस्कार
3. राहुल द्रविड (11 सामनावीर + 4 मालिकावीर)= 15 पुरस्कार
4. अनिल कुंबळे : (10 सामनावीर + 4 मालिकावीर) = 14 पुरस्कार
5. वीरेंद्र सहवाग : (8 सामनावीर + 5 मालिकावीर) = 13 पुरस्कार
6. विराट कोहली : (10 सामनावीर + 3 मालिकावीर) = 13 पुरस्कार
दरम्यान, टीम इंडिया-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा कानपूरमध्ये 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया त्यानंतर मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. तर त्यांनतर रोहितसेना बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे.