मुंबई – भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला कालपासून सुरुवात झाली. वानखेडे मैदानावर काल झालेली मॅच थोड्या वेळासाठी का होईना पण चांगलीच रंगतदार झाली. वानखेडेवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील दाखल झाले होते. सामना पाहताना त्यांनी एक ट्विट केले, जे खूप व्हायरल झाले.तसेच या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रिया तर अतिशय भन्नाट आहेत.
आपल्या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात, “मी ठरवलं की आज भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहायला जायचं. भारताच्या डावाच्या सुरुवातीला मी चेअर करायला आलो, मला वाटलं की मी विजय बघेन. मी आशा सोडलेली नाही पण इथे आल्यापासून आम्ही तीन विकेट गमावल्या आहेत. मी विकेट पडण्याचे कारण मानण्याआधी, मी येथून निघून जाईल”
झालं असं आनंद महिंद्रा ज्यावेळी मॅच पाहण्यासाठी पोहचले त्याच वेळी भारताच्या विकेट्स पडायला सुरुवात झाली. त्यात महिंद्रा यांनी केलेले ट्विट व्हायरल झाले. ज्यात त्यांनी भारताचा विजय पाहण्यासाठी आलो असल्याचे म्हंटले. महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटवर एका महिलेने रिप्लाय देत तुम्ही निघून जा सर असं म्हणतात आहे.
Please leave sir🙏🙏🙏
— Savita (@Savita23261360) March 17, 2023
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने स्कोअरबोर्डवर अवघ्या 188 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पहिल्या पाच षटकांतच १६ धावांत तीन विकेट गमावल्या. मात्र, सुरुवातीच्या धक्क्यांनंतर केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी शानदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.