World Cup 2023: विश्वचषकावर पूर्णपणे वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडियाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आणि घरच्या मैदानावर वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची संधी गमावली. 2011 मध्ये, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने विश्वचषक जिंकला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाची अनेक कारणे होती.
1) रोहित शर्मा बाद झाला –
भारतीय कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध तुफानी फलंदाजी करणारा तो एकमेव फलंदाज होता. त्याने 31 चेंडूत 4 चौकार आणि तीन षटकार मारत 47 धावा केल्या. त्याच्यासाठी क्रीजवर टिकून राहणे खूप महत्त्वाचे होते. असे झाले असते तर संघाची धावसंख्या जास्त होऊ शकली असती. ट्रॅव्हिस हेडच्या अप्रतिम झेलने त्याचा डाव संपुष्टात आला.
2) श्रेयस अय्यर आणि गिल लवकर बाद.
शुभमन गिल केवळ चार धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरलाही केवळ चार धावा करता आल्या. त्यामुळे भारत कुठेतरी बॅकफूटवर आला.
3) ट्रॅव्हिस हेडचा सोडलेला झेल –
या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समन ट्रॅव्हिसने टीम इंडियाचा पराभव केला. पहिल्याच चेंडूवर झेल सोडला नसता तर हेड शतक करू शकला नसता. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर ट्रॅव्हिड हेडचा झेल विराट कोहली आणि शुभमन गिलच्या जवळ पडला. तो झेल घेतला असता तर भारताला सुरुवातीपासूनच दडपण निर्माण करता आले असते.
4) भारतीय गोलंदाज खेळले नाहीत –
संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. त्यांनी कोणत्याही संघाला आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. 100 धावा करणेही प्रतिस्पर्ध्यांसाठी कठीण जात होते. मात्र, रविवारी उलट चित्र दिसून आले. 241 धावसंख्येचा बचाव करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना केवळ चार विकेट घेता आल्या.