Live Cricket Score (T20 World Cup 2024, Super 8, IND vs AUS) : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर एटमधील गट 1 मधील महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरो असा आहे.
भारताविरुद्धच्या या सुपर एट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय संघ फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरला आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक 2024 च्या 51 व्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारतासाठी लगावले तिसरे वेगवान अर्धशतक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात विराट कोहली लवकर बाद झाला असला तरी रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने सतत चौकार आणि षटकार मारले आणि अवघ्या 19 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, जे टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय फलंदाजाने केलेले तिसरे जलद अर्धशतक आहे.
FIFTY 🆙 for Captain Rohit Sharma in just 19 deliveries‼
He is leading from the front for #TeamIndia 👏
Follow The Match ▶️ https://t.co/L78hMho6Te#T20WorldCup | #AUSvIND | @ImRo45 pic.twitter.com/rfrMmFMsVv
— BCCI (@BCCI) June 24, 2024
त्याच्या आधी केएल राहुलने 2021 च्या विश्वचषकात 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आजही युवराज सिंगच्या नावावर आहे, ज्याने 2007 विश्वचषकात केवळ 12 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या होत्या.
रोहितचे षटकारांचेही द्विशतक
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 200 षटकार पूर्ण करणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला आहे. सुपर-8 मधील ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यापूर्वी रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीत 195 षटकार ठोकले होते, मात्र आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 5 षटकार मारल्यानंतर त्याने 200 षटकारांचा आकडा गाठला आहे.
टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार
रोहित शर्मा – 203*
मार्टिन गुप्टील – 172
जॉस बटलर – 137
ग्लेन मॅक्सवेल – 133
निकोलस पूरन – 132
शतक हुकले पण….
दरम्यान, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने शानदार फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्माला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. रोहित या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता आणि शतकाकडे वाटचाल करत होता, पण स्टार्कने गोलंदाजी करत भारतीय कर्णधाराचा डाव संपवला. रोहित 41 चेंडूत 7 चौकार अन् 8 षटकारासह 92 धावा करून बाद झाला. रोहित भलेही शतक झळकावण्यापासून चुकला असेल, पण टी-20 विश्वचषकातील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.