नवी दिल्ली – रोहितच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व करताना भारताला 295 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे रोहित शर्माने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताकडे बुमराह हा दीर्घकालीन पर्याय उपलब्ध असणार आहे. कारण वेगवान गोलंदाज असलेल्या बुमराहकडे कर्णधार बनण्याचे सर्व गुण असल्याचे भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले.
भारताला घराच्या भूमीवर न्यूझीलंडने 3-0 असे पराभूत केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय संघासाठी कठीण असल्याचे बोलले जात होते. त्यातच पहिल्या कसोटीमध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याचे, आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे आपसूकच उपकर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. या ईएसपीएन क्रिकइन्फोशी या संदर्भात बोलताना पुजारा म्हणाला, तो दीर्घकाळ कर्णधारपदासाठी चांगला पर्याय आहे यात शंका नाही.
घरच्या भूमीवर मालिकेत दारुण पराभव पत्करल्यानंतर भारत जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटी सामना खेळत होता, तेव्हा त्याने या कठीण परिस्थितीत आपल्या नेतृत्व कौशल्याचे एक उज्ज्वल उदाहरण सादर केल्याचे त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, मला विश्वास आहे की त्याच्यात संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, संघात महत्वाचा खेळाडू आहे. तो कधीच स्वतःबद्दल बोलत नाही, तो संघ आणि इतर खेळाडूशी संवाद साधतो.
अनुभवी खेळाडू परिस्थिती स्वीकारतात…
भारताला घरच्या मालिकेत न्यूझीलंडकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. पुजारा म्हणाला, अशा काही वेळा असतात, ज्यावेळी खेळाडूंना सल्ल्याची गरज नसते. आहे ती परिस्थिती ते स्वीकारतात. अनुभवी खेळाडू असेल तर तो शांत राहून परिस्थितीतून स्वतःला आणि संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हे चांगल्या कर्णधाराचे लक्षण असल्याचे पुजारा म्हणाला.
Border–Gavaskar Trophy 2024/25 : ॲक्शन व कौशल्यांमुळेच बुमराह भेदक गोलंदाज – स्टीव्हन स्मिथ
संवादासाठी तो चांगला माणूस
जसप्रीत बुमराह सर्वांशीच त्याचे चांगले संबंध आहेत. तो सातत्याने खेळाडूंशी संवाद साधत असतो. त्याच्यामुळे ड्रेसिंगरूममधील वातावरण खूप मैत्रीपूर्ण असते. अडचणीच्या काळात अनेक खेळाडू बुमराहशी बोलतात, असे पुजाराने सांगताना बुमराह क्रिकेटच्या बाहेर देखील तो नम्र असल्याचे म्हटले आहे.