पळसदेवला कलाविष्कारातून अतुल्य भारत सादर

पळसदेव – येथील एल. जी. बनसुडे इंग्लिश स्कूलमध्ये विविध कलागुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतुल्य भारत या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी देशाच्या विविधतेने नटलेली परंपरा नृत्यातून सादर केली. याशिवाय देशभक्‍तीपर गाण्यांवरही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केले.

सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, सरपंच अश्‍विनी काळे, मोटार वाहन निरीक्षक जयवंत पोळ, पोलीस निरीक्षक शंकर मोटेकर, सरपंच बळी बोराटे, डॉ. शीतलकुमार शहा, मेघराज कुचेकर, अनिल गिरमे, हभप सागर बोराटे, अनिल कुचेकर, सचिव ज्ञानेश्‍वर फुले, नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, प्राचार्य सूरज बनसुडे उपस्थित होते.

माने यांनी शाळेला दोन लाखाचा धनादेश दिला. बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या माध्यमातून शाळेला मदत करण्याचे आश्‍वासन दिले. सूत्रसंचालन फिरोज तांबोळी यांनी केले. प्रवीण मदने यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here