वाढत्या बेरोजगारीच्या आकड्यांमुळे मोदी सरकार चिंतेत

नवी दिल्ली – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र फेब्रुवारी २०१९ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. वाढत्या बेरोजगारीच्या  आकड्यांमुळे केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. मागील पाच वर्षांत जवळपास दोन कोटी पुरूष बेरोजगार झाले, असा धक्कादायक खुलासा  NSSO (नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस) च्या रिपोर्टमधून झाला आहे.

NSSO च्या रिपोर्टबाबत नामांकित इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.  ‘2017-18 या वर्षात NSSO ने केलेल्या सर्व्हेमधून खुलासा झाला आहे की, पुरुष कामगारांची संख्या 28 कोटी 60 लाख एवढी घसरली आहे, जी 2011-12 मध्ये 30 कोटी 40 लाख एवढी होती. तसेच 2011-12 पासून आतापर्यंत एकूण 4 कोटी 70 लाख रोजगार कमी झाले आहेत. या रिपोर्टमध्ये शहरी आणि ग्रामीण भागाची वेगवेगळी आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार शहरात बेरोजगारी दर 7.1 टक्के एवढा राहिला आहे तर ग्रामीण भागात हा दर 5.8 टक्के एवढा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.