बांधकाम अवस्थेतील गृहप्रकल्पांना होणारा विलंब पाहता ग्राहक रेडी पझेशनला पसंती देऊ लागले आहेत. पूर्वी विविध ऑफर आणि कमी किमतीमुळे बांधकामस्थितीतील प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असे. प्री-लॉचिंग ऑफरसारख्या योजनांतून ग्राहकांना लाभ मिळत असे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गृहप्रकल्प रेंगाळू लागले आणि ग्राहक आर्थिक अडचणीत सापडू लागले. एकीकडे बॅंकेचा हप्ता आणि दुसरीकडे घरभाडे यात अडकलेल्या ग्राहकांना घरासाठी तीन ते चार वर्षे वाट पाहावी लागत असे. परिणामी आता तयार घरांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे रिअल इस्टेट कंपन्यांना देखील ग्राहकांचा मूड पाहून ऑफरमध्ये नाईलाजाने का होईना बदल करावा लागत आहे. कमी किमतीच्या निवासी प्रकल्पाशिवाय रेडी पझेशनच्या सेगमेटमध्ये ग्राहकांचा कल वाढला आहे.
अशा स्थितीत कमी किमतीतील तयार घराच्या ऑफरमुळे विक्रीत सुधारणा होत आहे. रेडी पझेशनकडे झुकण्यामागचे कारण म्हणजे ग्राहक फसव्या आश्वासनापासून वाचतो. त्याचबरोबर रेडी पझेशनुमळे ग्राहकांची फसवणुकीची शक्यता कमी राहते. सर्वात मोठा फायदा म्हणजे रेडी पझेशनच्या घरावर जीएसटी द्यावा लागत नाही. एनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटने 2019 च्या पहिल्या सहामाहीचे सर्व्हेक्षण प्रसिद्ध केले होते. त्यानुसार मागणीच्या तुलनेत 36 टक्के नागरिकांचा कल हा रेडी पझेशनकडे झुकला आहे. त्यानंतर 24 टक्के नागरिकांना सहा महिन्यांतच घराचे पझेशन हवे आहे.