मध्यमवर्गीयात दुसऱ्या घराची वाढती मागणी (भाग-१)

स्वत:चे आणि हक्काचे घर हे कोणत्याही व्यक्तीचे स्वप्न असते. आयुष्यात कमावलेल्या पैशाचा मोठा हिस्सा आपण घरासाठी खर्च करतो. त्यानंतर जर एखाद्याकडे दुसरे घर खरेदीची क्षमता निर्माण होत असेल तर त्यावरून त्याच्या आर्थिक क्षमतेचा अंदाज येतो. आजकाल दुसरे घर खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. मध्यमवर्गीयांचे वाढते वेतनमानामुळे या विचारांना बळ मिळत आहे. जीवनमानात सुधारणा झाल्यामुळे आणि वाढत्या उत्पन्नामुळे मध्यमवर्गीय कुटुंब आणखी एक घर घेण्याच्या तयारीत दिसून येतात.

भारतात मध्यमवर्गीयांचा वर्ग वेगाने विकसित होत आहे. वाढत्या उत्पन्नामुळे घरगुती आणि जागतिक उद्योगांचे मध्यमवर्गीयांकडे लक्ष वेधले गेले आहे. हा घटक घराची मागणी वाढवण्यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषत: दुसरे घर.

मध्यमवर्गीयात दुसऱ्या घराची वाढती मागणी (भाग-२)

दुसरे घर खरेदी करण्यामागे अनेक कारणे असू शकतात. निवृत्तीनंतर राहण्याची व्यवस्था, गुंतवणूक, भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्नाचे साधन म्हणून व्यवस्था करणे आदी कारणांमुळे दुसरे घर खरेदीचा ट्रेंड वाढला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.