राज ठाकरेंमुळं वाढतोय करोना संसर्ग; औरंगाबादेत वकिलाकडून तक्रार दाखल

औरंगाबाद – राज्यात करोना संसर्गाच संकट गडद होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यभरात करोना नियम कडक करण्यात आले असून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सार्वजनिक ठिकाणी देखील मास्क वापरत नसल्याचे दिसून आले आहे. यावरून त्यांच्याविरुद्ध औरंगाबाद येथे तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.

राज ठाकरे मास्कशिवाय फिरताना दिसतात. राज यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी मास्क न घालण्याचं आवाहन इतरांना केलं होतं. यावरून ऍड. रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज यांच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मराठी भाषा दिनाच्या दिवशी राज ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मास्क घातलं नव्हतं. याव्यतिरिक्त नाशिक दौऱ्यात राज यांनी मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मास्क काढण्यास सांगितले होते. राज ठाकरे यांच्या मास्क न वापरण्याच्या कृतीमुळे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे रत्नाकर चौरेंनी यांच म्हणण आहे.

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क लावण्यावरून राज ठाकरे यांना नाव घेता टोला लगावला आहे. करोनाविषयीचे नियम पाळणं आवश्यक आहे. पण काही नेते मास्क लावतच नाहीत. पण अस न करता मास्क लावा आणि काळजी घ्या, असा सल्ला अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.