मुंबई – मोबाईल ग्राहकाकडून नंबर पोर्टेबीलीटीचा वापर वाढला आहे. याचा फायदा जीओ आणि एअरटेल कंपन्याला होत आहे. जीओ कंपनीकडे ऑगस्ट महिन्यात नवे 4.49 लाख इतके ग्राहक आले. त्यामुळे या कंपनीकडील ग्राहकांची संख्या आता 44.38 लाख इतकी झाली आहे.
दुसऱ्या क्रमांकावरील एअर टेल कंपनीकडे ऑगस्ट महिन्यात नवे 1.38 लाख इतके ग्राहक आले. त्यामुळे आता या कंपनीकडील ग्राहकांची संख्या 35.41 कोटी कोटी इतकी झाली आहे. मात्र आगस्ट महिन्यात व्होडाफोन या कंपनीच्या ग्राहकांची संख्या 8.33 लाखांनी कमी झाली आणि या कंपनीकडील ग्राहकांची संख्या 27.1 कोटी इतकी झाली आहे.