वाहनांच्या थर्डपार्टी विम्यात वाढ

पुणे – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जाहीर केलेल्या दरानुसार जुन्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या थर्डपार्टी विम्यात वाढ करण्यात आली.

यामुळे अशा वाहनचालकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. दरम्यान, यावेळी नवीन खासगी वाहनांच्या विमा दरात बदल करण्यात आलेला नाही. 2019-20 या वर्षासाठी नवीन दर जाहीर करण्यात आले. यात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विमा रकमेत वाढ करण्यात आली असून सुमारे एक ते साडेतीन हजारांपर्यंत ही वाढ आहे. नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या दुचाकींना पाच वर्षे तर चारचाकींना तीन वर्षांसाठी विमा काढावा लागत आहे. त्यांच्या दरामध्ये यंदा कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. दरम्यान, पर्यावरणपुरक इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी विमा दरामध्ये 15 टक्‍के सवलत देण्यात आली आहे. पर्यावरणपुरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी रकमेत बदल करण्यात आलेला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.