नवी दिल्ली – घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो सिलेंडरची किंमत आता 899.50 रुपये आहे. 5 किलो सिलिंडरचा नवीन दर आता 502 रुपये आहे. नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.
Petroleum companies have increased the price of domestic LPG cylinders by Rs 15. The price of a non-subsidized 14.2 kg cylinder in Delhi is now Rs 899.50. The new rate of 5kg cylinder is now Rs 502. The new rates are effective from today. pic.twitter.com/nQqtgdOq7q
— ANI (@ANI) October 6, 2021
विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमती बुधवार, 6 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी केवळ 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या.
पटनामध्ये एलपीजी सिलेंडरसाठी 998 रुपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकातामध्ये 926 आणि आता चेन्नईमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडर 915.50 रुपयांना मिळणार आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती लक्षात घेता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.