जहाज वाहतुकीत रोजगार वाढला

नवी दिल्ली – नौकांवरच्या भारतीय नाविकांच्या रोजगारात या वर्षी 35 टक्‍के अशी वाढ झाली आहे. 2017 मध्ये ही संख्या 154349 इतकी होती तर 2018 मध्ये 208799 एवढी झाली.

याशिवाय ऑन बोर्ड प्रशिक्षणासाठीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही 37 टक्‍क्‍यांची वाढ दर्शवत गेल्या वर्षीच्या 14307 वरून यावर्षी ही संख्या 19545 वर पोहोचली आहे.

भारतीय जहाजांवर रोजगार प्राप्त करणाऱ्या नाविकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या 22,103 वरून यावर्षी 27,364 पर्यंत वाढ झाली आहे तर परदेशी जहाजांवर रोजगार प्राप्त करणाऱ्या नाविकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या 60,194 वरून यावर्षी 72,327 पर्यंत वाढ झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)