अयोध्या – बाबरी मशिद पाडण्यात आल्याच्या घटनेचा स्मृती दिन 6 डिसेंबर रोजी साजरा होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत आता जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असल्याने त्या संबंधातही अयोध्येत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हाच बंदोबस्त आता पुन्हा लागू करण्यात आला असून तो 6 डिसेंबर पर्यंत तरी कायम ठेवला जाणार आहे असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अयोध्येत सुरक्षेसाठी एकूण चार झोन करण्यात आले आहेत.
मूळ 2.77 एकरची जी वादग्रस्त जागा आहे तो भाग रेडझोन म्हणून घोषित करण्यात आला असून संपुर्ण अयोध्या शहर हे यलोझोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. अयोध्या जिल्ह्यासाठी ग्रीन झोन आणि शेजारच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये ब्ल्युझोन अशी व्यवस्था करण्यात आली आहे.