मुंबईतील रेल्वेस्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवली

मुंबई – दहशतवादी कारवायांबाबातचा गुप्तचरांचा अहवाल मिळाल्यामुळे मुंबईतील सर्व महत्वाच्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दहशतवादी कारवायांचे एक पाकिस्तानी मोड्यूल नुकतेच उद्‌ध्वस्त केले होते. त्यात सहा जणांना अटक केली होती. त्याच्याशी संबंधित एकाला मुंबईतून एटीएसने ताब्यात घेतले आहे.

सध्या काही स्थानकावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांवर सुमारे सात हजार कॅमेरे लावण्यात आले आहेत, असे रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी सांगितले. दरम्यान दिल्लीत अटक केलेल्या मोड्यूलशी संबंधित एका व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून ताब्यात घेतले आहे.

झाकीर असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याला मुंबईचे उपनगर असणाऱ्या जोगेश्‍वरीमधून शुक्रवारी उचलण्यात आले. त्यानंत चौकशीसाठी त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली.
दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक करून मंगळवारी दहशतवादाचे एक मोड्यूल उद्‌ध्वस्त केले होते. त्यातील दोन संशयितांनी पाकिस्तानातून प्रसिक्षण घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या दहशतवाद्यांचा देशात अनेक ठिकाणी स्फोट घडवण्याचा कट होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात जान महंमद शेख या आरोपीला दिल्लीकडे जात असताना अटक करण्यात आली. तो मुळचा धारावीत राहणारा आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत झाकीरचे नाव पढे आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.