पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यासाठी विशेष रेल्वे सुरक्षा बलाच्या अतिरिक्त जवानांचे पथक तैनात केले आहे.
येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून स्थानकावर दरवर्षीप्रमाणे यंदादेखील सुरक्षेत वाढ केली आहे. मंगळवारपासून (10 ऑगस्ट) अतिरिक्त जवानांची नियुक्ती केली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील विविध ठिकाणी सुरक्षेसाठी हे जवान तैनात असणार आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील विविध ठिकाणी सुरक्षेसाठी हे जवान तैनात असणार आहेत.
दरवर्षी 15 ऑगस्ट दरम्यान सुरक्षा वाढविली जाते. यानुसार यंदाही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही, फिरते पथकही काम करत आहे. यामध्ये डॉग स्कॉडचा देखील समावेश असल्याची माहिती आरपीएफच्या पुणे विभागाचे सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांनी सांगितले.