नवी दिल्ली – ई-कॉमर्स व्यवहार वेगाने पूर्वपदावर येत असून या क्षेत्रातील काही कंपन्या नोकर भरती करीत आहेत. ऍमेझॉन कंपनीने म्हटले आहे की, आम्ही 20,000 अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहोत.
या कर्मचाऱ्यांना घरातून काम करू देण्याची मुभा देण्यात येणार आहे. किमान 12 वी पास असलेल्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी, हिंदी व मातृभाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. यांना व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस कार्यक्रमात दाखल केले जाणार असून, वर्षभरानंतर त्यांना स्थायी पदावर नियुक्त करण्याच्या शक्यतेवर विचार केला जाणार आहे. पुण्यासह हैदराबाद, कोईमतूर, अशा अकरा शहरांमध्ये या नियुक्त केल्या जाणार आहेत.