खेळाडूंचे मानधन वाढवले, बीसीसीआय भरपाईही देणार

मुंबई – बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत असलेल्या परंतु करोनामुळे नुकसान सोसलेल्या खेळाडूंना सामना रकमेच्या पन्नास टक्‍के भरपाई देण्याचा निर्णय घेतला.

तसेच रणजी करंडकासह सर्व प्रथम दर्जाच्या स्पर्धांतील खेळाडूंच्या मानधनातही वाढ केली आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयने शब्द पाळला आहे.

करोनामुळे गेल्या वर्षातील बहुतांशी स्पर्धा रद्द झाल्या होत्या. सर्वात मानाची समजली जाणारी रणजी करंडक स्पर्धाही होऊ शकली नाही.

देशांतर्गत क्रिकेट खेळत असलेल्या क्रिकेटपटूंना मोठ्या आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत होता. या क्रिकेटपटूंना बीसीसीआयने दिलासा दिला आहे. या खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.