हवेली तालुक्‍यात खासदारांच्या भेटीगाठी वाढल्या

आव्हाळवाडीच्या उपसरपंचांना दिल्या फोनवरुन शुभेच्छा

वाघोली (पुणे) – सध्या हवेली तालुक्‍यात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भेटीगाठी घेण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. आव्हाळवाडीच्या उपसरपंचपदी राजकन्या सागर आव्हाळे यांची नुकतीच निवड झाली आहे. त्याबद्दल खासदार कोल्हे यांनी फोनद्वारे संपर्क करून राजकन्या आव्हाळे यांना शुभेच्छा देत गावातील विकास कामांचा आढावा घेतला.

आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी यापूर्वीदेखील उच्चशिक्षित महिलांनी कार्यभार पाहिला होता. ह्या वेळेस उपसरपंचपदी राजकन्या आव्हाळे यांच्या रूपाने गावाला उच्चशिक्षित महिला उपसरपंच मिळाल्याने गावाचा कायापालट लवकर होणार असल्याची भावना पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस नवनाथ आव्हाळे यांनी व्यक्‍त केली आहे.

राजकन्या आव्हाळे यांच्या निवडीबद्दल शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, लोचनताई शिवले, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके, पंचायत समिती सदस्य नारायण आव्हाळे, माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, देविदास आव्हाळे,
आव्हाळवाडीच्या सरपंच ललिता आव्हाळे, सागर आव्हाळे, संदीप सातव, शरद आव्हाळे, प्रमोद आव्हाळे, सचिन गावडे, नितीन आव्हाळे मयूर आव्हाळे, अमोल आव्हाळे, सुखदेव आव्हाळे आदींनी अभिनंदन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.