मुंबई – शेअर बाजारात तेजी -मंदीच्या लाटा येत असल्यामुळे काही किरकोळ गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एसआयपीच्या माध्यमातून म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधून गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये या माध्यमातून तब्बल 67 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड या संस्थेने ही माहिती जारी केली आहे.
2016-17 मध्ये एसआयपीच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक केवळ 43,900 कोटी रुपये होती. त्यात आता जवळजवळ दुप्पट वाढ झाली आहे. मासिक पातळीवरही एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून येते. सप्टेंबर महिन्यात एसआपीच्या माध्यमातून 10,300 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. ऑक्टोबर महिन्यात ही गुंतवणूक 10,500 कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या पाच वर्षांत एसआपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक वार्षिक पातळीवर 30 टक्क्यांनी वाढले आहे.