पायाभूत सुविधांमुळे क्रेन्सच्या मागणीत वाढ

मुंबई: भारतात पायाभूत सुविधा वेगाने वाढत आहेत. त्यामुळे क्रेनसारख्या उत्पादनाची मागणी वाढणार असल्याचे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या कोनेक्रेन्स कंपनीकडून सांगण्यात आले. फिनलंडच्या भारतातील राजदूत नीना वास्कुंलाह्ती यांनी कोनेक्रेन्स कंपनीला भेट दिली. जेजुरी परिसरात कोनेक्रेन्सचे सर्वात मोठे उत्पादन केंद्र आहे. येथे दक्षिण आशियातील बाजारपेठेसाठी उत्पादने तयार केली जातात.

उत्पादन केंद्र सुमारे 48 हजार चौरस मीटर क्षेत्रफळात विस्तारलेले असून येथे 1100 कर्मचारी काम करतात. स्वयंचलित वाहने, पोलाद, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल यांसह अनेक उद्योगांसाठी लागणाऱ्या क्रेनचे या केंद्रात उत्पादन करण्यात येते. कोनेक्रेन्स दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास बक्षी म्हणाले की कंपनी मागील केवळ दहा वर्षांपासून क्रेन आणि संबंधित सुटे भाग यांच्या उत्पादनाबाबत कंपनी देशातील एक अग्रगण्य पुरवठादार बनली आहे. कोनेक्रेन्सचे जेजुरीतील उत्पादन केंद्र सौर उर्जेवर चालणारे जगातील अशा प्रकारचे पहिले केंद्र आहे. मगरपट्टा येथील कोनेक्रेन्सचे इंजिनीअरिंग नॉलेज सेंटर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)