वयासोबत त्यांची परिपक्‍वता वाढावी…

आशिष शेलार यांच्या संजय राऊत यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका करणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच पार्श्‍वभमीवर भाजपचे नेते खासदार संजय राऊत यांना टोलावजा शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांच्या वयासोबत त्यांची परिपक्‍वता देखील वाढावी अशा शब्दात शेलारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आशिष शेलार यांनी टीका करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा एकपात्री प्रयोग रोज सकाळी एका नेत्याकडून केला जातो आहे. पण या नेत्याचे हेतू सफल होणार नाहीत. अमित शहा आणि नरेंद्र मोदींना समजून घ्यायला संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील. त्यांनी जरा विचार करून वक्तव्य करावीत, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

सत्तेसाठी सध्या तीन पक्षांचा जो ड्रामा सुरू आहे. तो आम्ही बघतो आहोत. पूर्वी सगळे जण ठाकरे कुटुंबियांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जात होते. पण आता सत्तालालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलात गाठीभेटी होत आहेत. त्यांचे जे काही सुरू आहे ते आम्ही बघतोय, असेही सूचकपणे आशिष शेलार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.