वाहनाचा वेग वाढविणे ‘बाराच्या भावात’; 9 हजार रुपयांचा दंड वसूल

पुणे – एका चारचाकी वाहन चालकाला वाहनाचा वेग वाढविणे चांगलेच महागात पडले आहे. फिनिक्‍स मॉल येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मुंबई येथील वाहनचालकाकडून 9 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या चालकाने सर्वाधिक वेळा मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविल्याच्या नियमाचे पालन न केल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. “वन स्टेट, वन चलन’ द्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या आणि ई-चलनच्या माध्यमातून ऑनलाईन कारवाई करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी लष्कर वाहतूक पोलिसांनी “फोर्च्युनर’ चालकाकडून तब्बल 24 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला होता. रविवारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना “फोर्ड’ कंपनीची “लॅन्ड रोव्हर’ गाडी उभी केलेली दिसली. त्यांनी ई-मशीनद्वारे दंड पाहिला असता, 9 हजार रुपये दंड असल्याचे दिसले. त्यानंतर कोळी यांनी संबंधित वाहनचालकाकडून दंड वसूल केला. या दंडात अधिक वेगाने गाडी चालविल्याप्रकरणी तब्बल आठ हजार रुपयांचा, तर इतर हजार रुपयांचा दंड इतर नियम तोडल्याबद्दलचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.