हॅन्ड सॅनिटायझर्सचे उत्पादन वाढवावे

डिस्टिलरीज, साखर कारखान्यांना सरकारची सूचना

नवी दिल्ली: करोना विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी नागरिक, आरोग्यसेवक, रुग्णालय इत्यादींमध्ये हॅन्ड सॅनिटायझर्स वापरले जात आहेत. त्यामुळे हॅन्ड सॅनिटायझरच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मागणीनुसार पुरवठा व्हावा म्हणून महसूल आयुक्त, साखर आयुक्त आणि औषधनियंत्रक या राज्य सरकारच्या यंत्रणा तसेच विविध राज्यांचे जिल्हाधिकारी यांनी हॅन्ड सॅनिटायझर उत्पादकांना इथेनॉलचा पुरवठा होण्यातल्या सर्व अडचणी दूर करण्यास तसेच सर्व ऊस गाळप कारखान्यांना त्यासाठी परवानगी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा कारखान्यांना उत्पादन वाढवण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले आहे.

साधारणत: 45 गाळप कारखाने आणि 564 इतर उत्पादक यांना हॅन्ड सॅनिटायझरच्या उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे आणि 55 पेक्षा जास्त गाळप यंत्रणांना येत्या एक-दोन दिवसात ही परवानगी दिली जाईल. सध्याच्या परिस्थितीत अजून जास्त कारखान्यांना हॅन्ड सॅनिटायझर्सच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे ग्राहक तसेच रुग्णालयांना हॅन्ड सॅनिटायझरचा पुरवठा योग्य प्रमाणात होत राहील.सरकारने हॅन्ड सॅनिटायझरची एमआरपी म्हणजे जास्तीत जास्त किरकोळ किंमत निश्‍चित केली आहे. हॅन्ड सॅनिटायझर्सच्या 200 मि.ली. बाटलीची किरकोळ किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त असणार नाही,

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.