ऑक्सिजनचे उत्पादन 5 पट वाढवा; विभागीय आयुक्तांचे कंपन्यांना आदेश

साडेतीन हजार सिलिंडर्स वाढवले

पुणे – शहरासह ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सध्याच्या उत्पादन क्षमतेच्या पाच पट उत्पादन वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत. यासाठी प्रशासन सातत्याने उत्पादक व पुरवठादार यांच्याबरोबर बैठका घेत आहेत.

 

सध्या करोनासोबतच आता ऑक्सिजन पुरवठ्याचे नवीन संकट उभे राहिले आहे. परंतु जिल्ह्यात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पुणे जिल्ह्यात 11 ऑक्सिजन उत्पादक कंपन्या असून, सर्व कंपन्यांना पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

 

सध्या पुणे जिल्ह्यात दररोज 469.84 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. सद्यस्थितीत एकूण उत्पादित 80 टक्के ऑक्सिजनचा वापर हा वैद्यकीय, तर 20 टक्के वापर हा औद्योगिक कारणासाठी होत आहे. यापूर्वी हे प्रमाण 30 टक्के वैद्यकीय, तर 70 टक्के औद्योगिक वापरासाठी वापरण्यात येत होता.

 

जिल्ह्यात ऑक्सिजनचे उत्पादन व मागणी यामध्ये तफावत आहे. त्यामुळे आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा तळोजा, मुरबाड, रायगड येथून रिफिलिंग करून आणण्यात येत आहे. त्याचबरोबर सिलेंडरच्या क्षमतेतही वाढ करण्यात आली असून 3 हजार 500 नवीन सिलिंडर वाढविण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.