कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

सातारा  – महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. मागील आठ दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे कोयनेच्या पाणीसाठ्यात सहा टीएमसी पाण्याची भर पडली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत कोयना धरणात 16.57 टीएमसी पाणीसाठा झाला होता.

105 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात आठ दिवसापूर्वी 10.89 टीएमसी इतका पाणीसाठा होता. आठ दिवसांत चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी वाढत आहे. त्याचप्रमाणे उर्वरित धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये काही प्रमाणात वाढ होत
आहे.

सद्यःस्थितीत 13.50 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या धोम धरणामध्ये 2.15 टीएमसी, 10.10 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कण्हेर धरणामध्ये 1.87 टीएमसी, 4.08 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या बलकवडी धरणात 0.60 टीएमसी, 9.96 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या उरमोडी धरणात 1.13 टीएमसी, 5.85 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या तारळी धरणामध्ये 1.85 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.