महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्येही करोना बाधितांच्या संख्येत वाढ

अहमदाबाद  – मागील काही दिवसांपासून गुजरातमधील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्या राज्यातील चार प्रमुख शहरांमधील रात्रीची संचारबंदी आणखी पंधरवडाभर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना संकटामुळे अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोट या चार शहरांत मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्या निर्बंधाची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली. त्या शहरांमधील रात्रीची संचारबंदी 28 फेब्रुवारीला समाप्त होणार होती. मात्र, ती आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. रात्रीची संचारबंदी वाढवण्याची ही पाचवी वेळ आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी शुक्रवारी सायंकाळी राज्यातील करोनाविषयक स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर संबंधित निर्णय घेण्यात आला. नवे करोनाबाधित वाढत असल्याने त्या राज्यातील लसीकरण मोहिमेलाही गती दिली जाणार आहे. गुजरातमध्ये शुक्रवारी 460 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्या राज्यातील एकूण बाधित संख्या 2 लाख 69 हजारांवर पोहचली आहे. त्यातील 2 लाख 62 हजार बाधित आतापर्यंत बरे झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.