मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना समोर येत आहे. दरम्यान आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.
सांगलीत काल सायंकाळी चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय दाखल केलेल्या 12 रुग्णांची दुसरी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व रुग्णांना पुढील 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
जगभराताल आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास साधारण 3 लाख 78 हजार लोकांना कोरोना लागण झाली आहे. तर 16 हजर 502 जणांना या जीवघेण्या व्हायरसने बळी घेतला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 42 हजार नवे रुग्ण आढळले आहेत, तर 1861 जणांचा मृत्यू झाला आहे. इटली कोरोना व्हायरसचा उद्रेक पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये सर्वाधिक 6,077 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात इटलीत 601 जणांना आपला जीव गमावला आहे.