पुणे – तापमानात वाढ आणि काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती शहरात अनुभवायला मिळत आहे. दिवसा ऊन्हाचा कडाका आणि रात्री ठंडी जाणवत आहे.
शहतील तापमानात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. 28 ते 29 अंश सेल्सिअस रम्यान असणारा तापमानाचा पारा तिशी ओलांडून आता 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पुढील काही दिवस तापमानात वाढ कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मंगळवारी शहरात कमाल 33.6 अंश, तर किमान 19.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून राज्यात सुरू असलेला पाऊस आता पूर्णपणे थांबण्याची शक्यता आहे.
मान्सूनने पश्चिम राजस्थानमधून सुरू केलेला परतीचा प्रवास आता वेगाने पुढे जात आहे. मंगळवारी मान्सूनने उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला. लवकरच महाराष्ट्रातूनही परतीचा प्रवास सुरू करणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.