नवी दिल्ली – देशात आत्महत्यांच्या प्रमाणात (suicide rates) वाढ झालेली दिसून येत असून सन 2021 च्या कॅलेंडर वर्षात तब्बल 1 लाख 64 हजार जणांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या (National Crime Record report) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 1 लाख 19 हजार जण पुरूष असून 45 हजार 26 महिला आहेत. 29 तृतीयपंथियांनीही या वर्षात आत्महत्या केल्याचा उल्लेख या (NCRB report 2021) अहवालात करण्यात आला आहे.
सन 2020 मध्ये देशात एकूण 1 लाख 53 हजार जणांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या तुलनेत सन 2021 मधील आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. सन 2019 साली 1 लाख 39 हजार जणांनी, आणि सन 2018 साली 1 लाख 34 हजार जणांनी आत्महत्या केली आहे. सन 1967 सालापासून देशातील आत्महत्यांच्या प्रकारांची नोंद ठेवली जात आहे.