रिअल इस्टेटसाठी चांगली वार्ता आहे. देशातील टॉप रिअल इस्टेट कंपन्यांच्या घरांच्या विक्रीत वाढ होऊन ती 5,520 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एनरॉकच्या मते डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, महिंद्रा लाइफ स्पेस, ओबेरॉय रिअल्टी, प्रेस्टिज, शोभा, पुर्वांकरा, ब्रिगेड, कोलते पाटील डेव्हलपर्सच्या घरांच्या विक्रीत दुसऱ्या तिमाहीत दोन टक्क्याने वाढ नोंदविली आहे. देशातील या आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांची विक्री यादरम्यान स्थिरच राहिली आहे.
या नऊ कंपन्यांची विक्री तिमाहीच्या आधारावर 5 टक्क्याने तर वार्षिकच्या आधारावर 2 टक्क्याने वाढून ती 5520 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार गोदरेज प्रॉपर्टीची सर्वाधिक 1,440 कोटी रुपयांची घरांची विक्री होऊन ती 9 कंपन्यांत आघाडीवर राहिली.
त्यानंतर प्रेस्टिज इस्टेटने 1030 कोटींची घरे विकून ती दुसऱ्या स्थानावर, 730 कोटींची घरांची विक्री करून डीएलएफ तिसऱ्या स्थानावर आणि 680 कोटींच्या घरांची विक्री करून शोभा लिमीटेड चौथ्या स्थानावर राहिली आहे. रिअल इस्टेटला बुस्ट देण्यासाठी केंद्र सरकारने केलेले प्रयत्न पाहता या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.