नवी दिल्ली – अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे.सप्टेंबर महिन्यामध्ये पायाभूत क्षेत्रातील उद्योगांची उत्पादकता 4.4 टक्क्यांनी वाढली आहे.
या महिन्यामध्ये नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, सिमेंट या क्षेत्रातील उत्पादन वाढले आहे. या आकडेवारीसाठी आठ पायाभूत सुविधा क्षेत्राचा विचार करण्यात येत असतो.
या क्षेत्राची उत्पादकता वाढल्यामुळे एकूण औद्योगिक उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एकूण औद्योगिक उत्पादनात पायाभूत क्षेत्राचा 40 टक्के समावेश असतो. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत पायाभूत क्षेत्राची उत्पादकता 16.6 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी या काळात या क्षेत्राची उत्पादकता कररोनामुळे 14.5 टक्क्यांनी कमी झाली होती.