पुणे – मागणी असल्याने मार्केट यार्डातील फळविभागात लिंबू, कलिंगड, खरबूज, पपई, बोरे आणि चिकूच्या भावात वाढ झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व प्रकारचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी मार्केटयार्डात फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, मोसंबी 25 ते 30 टन, संत्री 15 ते 20 टन, डाळिंब 15 ते 20 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू 600 क्रेट, चिकू 1 हजार गोणी, खरबुजाची 10 ते 15 टेम्पो, बोरे 150 ते 200 गोणी, स्ट्रॉबेरी 10 ते 15 टन, द्राक्षे 20 ते 25 टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव
लिंबे (प्रति गोणी) : 300-650, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : जुना (3 डझन) : 320-600, (4 डझन) : 130-200, मोसंबी नवीन (3 डझन) : 230-360, (4 डझन) : 100-180, संत्रा : (10 किलो) : 200-600, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 50-250, गणेश : 20-80, आरक्ता 30-100. खरबूज : 15-22, पपई : 5-12, चिकू (10 किलो) 100-700, पेरू (20 किलो) : 350-600, बोरे (10 किलो) चमेली : 200-300, उमराण : 80-150, चेकनट : 900-1000, चण्यामण्या 350-500, स्ट्रॉबेरी (दोन किलो) 80-250.