महागाई भत्ता वाढल्यामुळे बाजारातील वर्दळ वाढणार!

पुणे – अपेक्षेप्रमाणे केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्याचबरोबर थकबाकी एकदाच देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात बराच पैसा येणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात बाजारातील उलाढाल वाढण्याची शक्‍यता आहे.

केंद्र सरकारने आपल्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारही कमी-अधिक प्रमाणात वाढ करीत असते. त्यामुळे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळी अगोदर महागाई भत्त्यात वाढ मिळण्याची शक्‍यता आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महागाई भत्ता 5 टक्‍क्‍यांनी वाढून 17 टक्‍के इतका केला आहे.त्यामुळे दिवाळीच्या काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याकडे

11 हजार कोटी रुपये येणार आहेत. त्यामुळे हा पैसा बाजारात येण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार बहुतांश बॅंकांनी कर्जावरील व्याजदर कमी केले आहे. त्याचबरोबर कंपन्या आणि खासगी संस्थांचा बोनस या काळात मिळतो. यामुळे मंदीचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांना वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.