संसर्गजन्य आजारांत वाढ

पावसाळ्यानंतर डेंग्यूसारख्या व्हायरल संसर्गांच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यासह नाक, घसा व श्‍वसनमार्गांवर परिणाम करणाऱ्या ऍलर्जिंक दमा, नासिकाशोथ, सीओपीडी सारख्या अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्‍ट इंफेक्‍शन्समध्येदेखील वाढ होते. श्‍वसनविषयक आजारांसंदर्भात शहरातील हॉस्पिटल्समध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बहुतेक श्‍वसनविषयक आजारांमध्ये तीव्र सुका खोकला हे प्रमुख लक्षण दिसून आले आहे. शहरातील डॉक्‍टर्स नागरिकांना स्वत:हून खोकल्याचा उपचार न करण्याचे आणि एका आठवड्यापेक्षा अधिक काळ खोकल्याचा त्रास होत असेल तर चेस्ट स्पेशालिस्टचा सल्ला घेण्याचे आवाहन करत आहेत.

तीव्र सुक्‍या खोकल्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी फेन्सेडीलसारख्या कोडेइन आधारित कफ सिरप्सचा वापर करता येऊ शकतो. ज्यामुळे आजाराचे निदान होण्यापूर्वी रुग्णांना बरे वाटू शकते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या संसर्गजन्य आजाच्या रुग्णांच्या संख्येत 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून डॉक्‍टर्स दररोज 100 ते 120 रुग्णांचा उपचार करत आहोत.

या रुग्णांपैकी 40 ते 45 रुग्णांमध्ये अप्पर रेस्पीरेटरी सीझनल कफ आणि श्‍वसनविषक समस्यांसह सीझनल दमा, ऍलर्जिक नासिकाशोथ आणि व्हायरल न्यूमोनिया आढळून आले आहेत. पर्यावरणीय बदल आणि फुप्फुसांवर परिणाम करणाऱ्या विषाणूंमुळे या आजारांमध्ये वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे ही स्थिती अधिकच बिकट झाली आहे. श्‍वसनविषयक आजारांनी पीडित अनेक रुग्णांना सुका खोकला, नाक चोंदणे आणि धाप लागणे अशा गोष्टींचा त्रास जाणवत आहे.

आजाराचे निदान होण्यापूर्वी या रुग्णांना आराम देण्यासाठी कफ सिरप्सचा उपचार देता येऊ शकतो. हे सिरप्स वैद्यकीय निरिक्षणांतर्गत सुका खोकल्यापासून आराम मिळण्यासाठीही वापरता येऊ शकतात. खोकला हा रुग्णांमध्ये दिसून आलेला सामान्य आजार आहे. सुक्‍या खोकल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोडेइन-आधारित सूत्रीकरणाला सुवर्ण दर्जाचे प्रमाण देण्यात आले आहे.

मुसळधार पावसानंतर घसा खवखवणे, खोकला, नाक चोंदणे, छातीत दुखणे ही लक्षणे सामान्यपणे दिसून येत असली तरी ही लक्षणे तीव्र आजार/व्हायरस संसर्गांची चिन्हे असू शकतात आणि या लक्षणांचा रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पुणे शहरवासीयांनी पुढील दिवस अतिरिक्‍त प्रतिबंधात्मक काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच रस्त्यावरील पदार्थ खाण्याचे टाळणे, आरोग्यदायी आहार राखणे आणि एका आठवड्यापेक्षा अधिक काळ सुका खोकला असल्यास चेस्ट स्पेशालिस्टचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

डॉ. आर. के चोप्रा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)