शिरूर, (वार्ताहर)- शिरूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण वाढत चालले आहेत… शिरूर नगरपरिषदेच्या वतीने शिरूर शहरात बचत गटांतील महिलांद्वारे डेंग्यू सर्वेक्षण सुरू केले असून त्वरीत उपाययोजना करण्याचे काम नगर परीषदेने सुरू आहे. तरी नागरिकांनी डेंग्यूबाबत काळजी घेण्याचे आवाहन शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले आहे.
शिरूर शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व पेशी कमी होण्याची रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याबाबत नगरपरिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी, फॉग मशीनच्या साह्याने धूर फवारणी सुरू केली असून, स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे.
बचत गटांच्या महिला सर्वेक्षणासाठी शहरात नेमले असून या महिला घरोघरी जाऊन घरात किंवा घराच्या आसपास पाणी साठवलेले आहे का? याबाबत तपासणी करत आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असेही नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आपल्या भागात जंतुनाशकाची फवारणी व धूर फवारणी नागरिकांनी होती का नाही याबाबत नगर परिषदेस कळवावे. ज्या भागात पाणी साठवण्याचे प्रमाण व डासांच्या आळ्या मोठ्या प्रमाणात आढळले आहे. तो भाग संवेदनशील म्हणून त्या भागात लक्ष केंद्रित करून नागरिकांना याबाबत सतर्क राहण्याचे व उपायोजना नगर परिषदेच्या वतीने करण्याचे काम सुरू आहे.
शहरातील हुडको वसाहत, प्रीतम प्रकाशनगरचा भाग, हळदी मोहल्ला या भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले असल्याचे त्यांनी सांगून या भागातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या कर्मचार्यांना सहकार्य करावे व आपल्या भागात डेंग्यूचे रुग्ण कमी कसे होते यासाठी नगरपरिषद, नागरिक, आरोग्य खाते यांनी संयुक्तपणे काम सुरू केले आहे.
डेंग्यूबाबत शहरात जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटण्यात आली असून, नागरिकांनी घरावरील पाण्याच्या टाक्या, मोकळे टायर, मडके, ड्रम व ज्यामध्ये पाणी साठवले जाऊ शकते त्या सर्व वस्तू कोरड्या करून घ्याव्यात. ज्या भागात डबक्यांमध्ये डेंग्यू डासाच्या आळ्या सापडतील त्या भागात नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक ऑइल टाकले जात आहे. शहरातील सर्वच रुग्णालय छोटी रुग्णालय यांनी त्यांच्याकडे डेंग्यू चे रुग्ण आढळले तर त्याची माहिती नगरपरिषद व आरोग्य खात्याला द्यावी असे आव्हानही मुख्याधिकारी काळे यांनी केले आहे.