चीनकडून डिफेन्स बजेटमध्ये वाढ

बीजिंग : संपूर्ण जग करोनाचा सामना करण्याचे तसेच आपली आरोग्यसेवा बळकट करण्याचे प्रयत्न करत आहे. जगातील प्रत्येक देश लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तर या काळातही  चीन आपल्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अधिक जोर देताना दिसत आहे. चीनने आपल्या डिफेन्स बजेटमध्ये वाढ करून ते १७९ अब्ज डॉलर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनंतर संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणारा चीन हा दुसरा देश आहे.

चीनचे डिफेन्स बजेट भारताच्या डिफेन्स बजेटच्या तुलनेत तिप्पट आहे. गेल्या वर्षी चीनचे डिफेन्स बजेट १७७.६ अब्ज डॉलर्स होते. सद्य परिस्थितीत पाहता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चीनने आपल्या डिफेन्स बजेटमध्ये कमी वाढ केली आहे. करोनामुळे अर्थव्यवस्थेला बसलेली खिळ हे यामागचे मुख्य कारण असल्याचे  म्हटले जात आहे.

शुक्रवारी चीनने सादर केलेल्या मसुद्यातील माहितीनुसार, २०२० मध्ये चीनच्या डिफेन्स बजेटमधील वृद्धी दर हा ६.६ टक्के राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर २० लाख जवानांसह चीनचे सैन्य हे जगातिल सर्वात मोठं सैन्य ठरणार आहे. सलग पाचव्या वर्षी चीनने आपल्या डिफेन्स बजेटमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी वाढ केली असल्याची माहिती चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने माहिती  दिली आहे. डिफेन्स बजेटच्या मसुद्यानुसार यावर्षी चीनचे डिफेन्स बजेट १ हजार २७० अब्ज युआन म्हणजेच १७९ अब्ज डॉलर्स इतकं असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.