मॉस्को – रशियामध्ये करोनाची साथ पुन्हा वाढायला लागली आहे. त्यामुळे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी आठवडाभराची पगारी सुटी जाहीर केली आहे. 30 ऑक्टोबरपासून ही पगारी सुटी सुरू होणार आहे.
करोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे आणि स्वतःचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पुतीन यांनी केले आहे. आठवडाभराची पगारी सुटी जाहीर करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला आपला पाठिंबा असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. 30 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत सरसकट सर्व कामगारांना ही पगारी सुटी असणार आहे.
गेल्या काही आठवड्यात रशियात करोनामुळे मृतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नव्याने करोनाची बाधा होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. गेल्या 24 तासात रशियामध्ये 1,028 नवीन मृत्यूची नोंद झाली आहे.
करोनाची साथ सुरू झाल्यापासून एका दिवसातील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. रशियामध्या आतापर्यंत 2 लाख 26 हजार 353 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.